Thursday, May 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजीएसटीत बदल होताच काही दुचाकी वाहन स्वस्त तर काही वाहने महागणार..!

जीएसटीत बदल होताच काही दुचाकी वाहन स्वस्त तर काही वाहने महागणार..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी(Goods and Service Tax)यात मोठा बदल करण्यात येणार आहे.केंद्र सरकारने जीएसटी बाबत मोठी घोषणा केली आहे.येत्या,सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून नवी कर प्रणाली लागू केली जाणार आहे. जीएसटीत बदल होताच काही दुचाकी वाहन स्वस्त तर काही दुचाकी,चारचाकी वाहने महाग होणार आहेत. बदलामुळे ३५० सीसीच्या खालील दुचाकी २० हजार रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत.मात्र,जीएसटी वाढल्याने रॉयल एनफील्ड,हिमालयन आणि गुरिल्ला सारख्या ४००-४५० सीसीच्या बाईक्स २५ हजार रुपयांपर्यंत तर ६५० सीसी बाईक्सच्या किंमती ४० हजार रूपयांपर्यंत वाढणार आहेत.
बाजारातील ९५ टक्के हून अधिक हिस्सा असलेल्या ३५० सीसी(cc)पेक्षा कमी क्षमतेच्या छोट्या कार आणि दुचाकींसाठी आनंदाची बातमी आहे.१,२०० सीसीपर्यंतचे पेट्रोल,एलपीजी,सीएनजी आणि हायब्रिड कार तसेच १,५०० सीसीपर्यंतच्या डिझेल कार आणि ४,००० मिमीपेक्षा कमी लांबीच्या वाहनांवर आता १८ टक्के जीएसटी लागेल.याआधी हा कर ३१ टक्के पर्यंत (सेससह)होता.एसयूव्ही (SUV) आणि लक्झरी कारसाठी तो कमी होऊन ४० टक्के झाला आहे,तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींना देखील लाभ होणार असून,त्यांच्यावरील जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के पर्यंत खाली आला आहे.यामुळे,नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी त्या अधिक परवडणाऱ्या ठरतील.हिरो स्प्लेंडर,होंडा शाइन,टीव्हीएस अपाचे यासारख्या गाड्या परवडणाऱ्या किंमतीत मिळतील.होंडा ॲक्टिव्हा, टीव्हीएस स्कूटी सारख्या स्कूटर्सच्या किंमती सुमारे ८ हजार रूपयांपर्यंत कमी होतील.सुमारे १ लाखाच्या बाईकची किंमत आता ९० हजार रुपये असेल.याउलट,३५० सीसी आणि त्याहून अधिक क्षमतेच्या मोठ्या बाइक्सवर २८ टक्के वरून ४० टक्के पर्यंत जीएसटीचा मोठा भार पडला आहे. यामुळे,रॉयल एनफील्ड,केटीएम,हिरो मोटोकॉर्प,बजाज, ट्रायम्फ आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची किंमत लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!