Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरपाऊस पडताच ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग होतो बंद; नागरिक हैराण..

पाऊस पडताच ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग होतो बंद; नागरिक हैराण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरापासून देसाईगंज (वडसा)मार्गे काही अंतरावर असलेल्या भूतीनाल्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून पाऊस येताच ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद पडत असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.ब्रम्हपुरी शहर हे डॉक्टरांचे शहर म्हणून उदयास आले असल्याने शहरातील रुग्णालयात गडचिरोली, गोंदिया,भंडारा व इतर जिल्ह्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जात असतात.पूर्वी भूतीनाला कमी उंचीचा असल्याने नवीन उंच पुलाचे बांधकाम तब्बल दोन वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही.पाऊस आला की,दररोजची वाहतूक ठप्प होते.विद्यार्थी,व्यापारी व रुग्णांचे हाल होतात. पुलाच्या बाजूने एक रपटा तयार करण्यात आला.मात्र, पाऊस पडल्यानंतर सदरचा रपटा बंद होतो.वारंवार वाहतूक बंद होत असल्याने नागरिकांसह वाहनधारक  हैराण झाले असल्याने पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!