Wednesday, August 5, 2026
Homeबीडपहिल्यांदा दोन वर्षीय मुलीला लटकवले फासावर व नंतर स्वतःही घेतला गळफास..!

पहिल्यांदा दोन वर्षीय मुलीला लटकवले फासावर व नंतर स्वतःही घेतला गळफास..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात एक धक्कादायक तितकाच काळीज पिटाळून लावणी घटना आज,सोमवार १८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.चक्क आईने पोटच्या गोळ्याला गळफास लावून मारून टाकले आणि स्वतःही आयुष्याची दोर कापत जीवन संपविल्याने परिसरातील समाजमन सुन्न झाले आहे.सदरची घटना ही गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे घडली.२५ वर्षीय अंकिता बळीराम घवाडे व दोन वर्षीय शिवप्रीती बळीराम घवाडे रा.मालेगाव,ता.गेवराई,जि.बीड असे मृत पावलेल्या आई व मुलीचे नाव आहे.
आज श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने घरातील सर्व कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते.घरी अंकिता व चिमुकली होती.अश्यातच दुपारच्या सुमारास अंकिताने सर्वप्रथम आपल्या दोन वर्षीय मुलीला फासावर लटकवले व नंतर घराच्या आड्याला स्वतःही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.घटनेची माहिती शेजारील नागरिकांना होताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटनास्थळ गाठत माय-लेकीचे मृतदेह बीडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. माय लेकीच्या मृत्यूचे कारण गावकऱ्यांना तसेच पोलिसांनाही कळले नसून त्या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!