Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूर१६ वर्षीय दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू..! - दुपारच्या घटनेने हळहळ..

१६ वर्षीय दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू..! – दुपारच्या घटनेने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात आज, शनिवार १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास नदीत पोहायला उतरलेल्या दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.आयुष दीपक गोपाले वय १६ वर्षे व जीत टीकाराम वाकडे वय १६ वर्षे दोघेही रा.महालक्ष्मी नगर,सिंदेवाही,जि.चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत.दोघेही दहावीत शिकत होते.घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष व जीत हे दोघेही शाळेला कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी असल्याने आज शनिवारी दुपारच्या सुमारास सिंदेवाही शहरापासून काही अंतरावर असलेल्या टेकरी गावाजवळील नदी तीरावर फिरायला गेले होते.फिरून झाल्यानंतर दोघेही नदीत आंघोळीसाठी उतरले आणि पोहू लागले.पोहत असतांनाच पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले.खोल पाण्यात जाताच दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाद्वारे दोघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचे दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास सिंदेवाही पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!