Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीघराबाहेर पडली 'ती' परतलीच नाही; अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागेना..!

घराबाहेर पडली ‘ती’ परतलीच नाही; अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-नेहमी कॉलेजला जाणारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही.कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करुनही तिचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी आरमोरीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सदर प्रकरण उजेडात आले.आरमोरी तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी ११ वीत शिक्षण घेत आहे.ती दररोज कॉलेजला जात होती.मात्र,चार दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवार ११ ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे ती कॉलेजला जाते म्हणून सकाळच्या सुमारास घराबाहेर पडली.कॉलेजची सुट्टी दुपार पर्यंत होत असल्याने ती दुपारी घरीच गेली नाही.त्यामुळे कुटूंबीय चिंताग्रस्त झाले.मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या पालकांनी कॉलेजला जाऊन विचारपूस केली असता,ती कॉलेजात गेली नसल्याची माहिती मिळाली. नातलग,मित्र-मैत्रीण व इतर ठिकाणी शोध घेऊनही ती कुठेच आढळून आली नसल्याने १७ वर्षीय मुलगी कुठे गेली असावी? कुणी फुस लावून पळवून तर नेले नसावे? या विवंचनेत असतांनाच मुलीच्या कुटुंबीयांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार अज्ञाता विरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष काडोळे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!