Saturday, July 11, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत मॅरेथॉन तथा जनजागृती रॅली संपन्न..

गडचिरोलीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मॅरेथॉन तथा जनजागृती रॅली संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे.याच अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्हा प्रशासनाने आज,गुरुवार १४ ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धा आणि जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.आज सकाळी आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात जिल्हा परिषदेपासून झाली. जिल्हाधिकारी पंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली.मॅरेथॉनचा मार्ग जिल्हा परिषद ते एलआयसी चौक,आयटीआय चौक असा होता आणि पुन्हा जिल्हा परिषदेजवळ येऊन त्याची सांगता झाली.या मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील,समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.
या मॅरेथॉनसोबतच नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी एक भव्य रॅली काढली.या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!