Sunday, July 12, 2026
Homeभंडाराशेतातील धुऱ्यावरून पाय घसरून बांधीत पडला तो उठलाच नाही..!

शेतातील धुऱ्यावरून पाय घसरून बांधीत पडला तो उठलाच नाही..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव शेत शिवारात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.धान पिकाची पाहणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या एका शेतकऱ्याचा शेतातील धुऱ्यावरून चालत जात असतांनाच पाय घसरला आणि तो थेट बांधीत पडला.बांधीत पाणी व चिखल असल्याने शेतकऱ्याच्या नाका तोंडात गेले.त्यामुळे श्वास कोंडला गेला आणि शेतकऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला.दिनेश बाळकृष्ण शिवणकर वय ५० वर्षे, रा.कुडेगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
दिनेश शिवणकर हे काल बुधवारी दुपारच्या सुमारास शेतावर धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पायी जात असतांना दिनेश यांचा पाय घसरल्याने शेतात साचलेले पाणी व चिखलात ते कोसळले.यात त्यांच्या नाका-तोंडात पाणी व चिखल गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.सदरची घटना शेतशिवारातून घरी परत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर घटनेची माहिती पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबांसह लाखांदूर पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस अंमलदार विकास रणदिवे यांचेसह पोलिस हवालदार सतीश सिंगनजुडे घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर रुग्णालयात पाठविला. लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!