Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरअखेर तरुणाच्या हत्येचा उलगडा; एका मुलीसाठी तरुणाची हत्या..!

अखेर तरुणाच्या हत्येचा उलगडा; एका मुलीसाठी तरुणाची हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहराच्या रामनगर पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या अष्ठभुजा वॉर्डात सोमवारी ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मारहाण करून तरुणाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार रामनगर पोलिस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता मारहाण करणारे आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळताच तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या दोन तासात चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.२६ वर्षीय सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम,३० वर्षीय टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे,३० वर्षीय सुलतान अली साबीर अली,३८ वर्षीय बबलु मुनीर सय्यद सर्व रा.अष्टभुजा वॉर्ड,चंद्रपूर अशी आरोपींची नावे असून आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.चौघांनीही ३५ वर्षीय छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ रा.अष्टभुजा वॉर्ड या तरुणाची लाठीकाठीने मारहाण करून हत्या केली होती.सदरची हत्या ही प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.अश्यातच आता पोलिस तपासात एका मुलीसाठी हत्या केल्याचे उघड झाले आहे.आरोपी सुमोहित उर्फ गोलू याची मैत्रीण होती.त्या मैत्रिणीशी मृणाल हेडाऊ हा जवळीकता वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब सुमोहित व त्याच्या मित्रांना कळाली.त्यामुळे चौघांनीही त्यास बेदम मारहाण केली.मारहाणीत मृणाल हेडाऊ याचा मृत्यू झाला.प्रकरणी चौघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.विशेष म्हणजे,मयत मृणाल हा विवाहित होता.त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नसल्याने तो घरी एकटाच राहायचा.क्षुल्लकशा कारणासाठी त्याला जीव गमवावा लागला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!