Thursday, June 4, 2026
Homeचंद्रपूरधक्कादायक..! २० वर्षीय तरुणाचे चार वर्षीय अल्पवयीन चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य..

धक्कादायक..! २० वर्षीय तरुणाचे चार वर्षीय अल्पवयीन चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका २० वर्षीय नराधम तरुणाने चक्क चार वर्षीय अल्पवयीन चिमुकल्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याने स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि बालहक्क संरक्षण समित्यांनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा मिळण्याची मागणी केली  आहे.सदरची घटना ही चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरात सोमवारच्या रात्री घडली असून काल,मंगळवार २२ जुलै रोजी सर्वत्र उघडकीस आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.साहिल तेलंग वय २० वर्षे, रा.ता.वरोरा,जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
वरोरा शहरातील एका तलाव परिसरात तलावाच्या मधोमध काही वर्षांपूर्वी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.सदर तलाव हे वरोरा नगरपरिषदेच्या अखत्यारीत येते.गेल्या काही कालावधीपासून तलावातील उद्यानात व्यसनाधीन मुलांचा वावर वाढलेला असल्याची परिसरात चर्चा आहे.अश्यातच सोमवारच्या रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान साई मंगल कार्यालय येथे वास्तव्यास असलेल्या साहिल तेलंग या आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलास तलाव परिसरात नेले आणि अनैसर्गिक कृत्य केले.सदरची घटना तेथील काही नागरिकांना माहीत होताच नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.त्यानंतर पीडित बालकाने सदरची बाब घरी गेल्यानंतर वडिलाला सांगितली.वडिलाने तक्रार केल्यानंतर वरोरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे,पोलिस उपनिरीक्षक मनोज वासाडे,शरद मस्के,तीरानकर यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!