Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरशिक्षकी पेशाला काळिमा; ५२ वर्षीय शिक्षकाकडून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग..

शिक्षकी पेशाला काळिमा; ५२ वर्षीय शिक्षकाकडून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गुरूची आज्ञा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान देते.शालेय शिक्षण घेत असतांना ज्या गुरूवर विश्वास ठेऊन ज्ञानार्जनाचे धडे गिरवल्या जाते,असे शिक्षकच भक्ष होत असतील तर एवढे मोठे पाप कुठे फेडणार,अशी म्हणण्याची वेळ काही शिक्षकांच्या बाबतीत उघड होऊ लागली आहे. अश्याच प्रकारे गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासल्याची घटना काल मंगळवारी चंद्रपुरात उघडकीस आली आहे.एका ५२ वर्षीय शिक्षकाने चक्क शाळेतीलच इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी शिक्षकास तात्काळ बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली आहे. लक्ष्मीकांत धर्मपुरीवार,असे शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
आरोपी लक्ष्मीकांत धर्मपुरीवार हा चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका जिल्हा परिषद
शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.चार दिवसांपूर्वी त्याने पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता.त्यामुळे ती घाबरली आणि तिने तिच्या मैत्रिणीला याबाबत सांगितले.मैत्रिणीने सदरची माहिती पीडितेच्या आईला सांगितली.पिडीत मुलीच्या आईने शाळेत जाऊन एका शिक्षिकेला याबाबत जाब विचारला असता,त्यांनी शाळेत चौकशी करून शाळा व्यवस्थापन समिती तसेच पंचायत समिती प्रशासनाला सांगितले. त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाच्या चौकशीअंती वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शिक्षक लक्ष्मीकांत धर्मपुरीवार याच्याविरुद्ध बीएनएस ७४ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अटक करून आरोपीस तात्काळ न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!