Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीत राज्यस्तरीय 'नाट्यश्री मासिक कविता' स्पर्धेस प्रारंभ.. - इच्छुक कवींनी संपर्क साधण्याचे...

गडचिरोलीत राज्यस्तरीय ‘नाट्यश्री मासिक कविता’ स्पर्धेस प्रारंभ.. – इच्छुक कवींनी संपर्क साधण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच  गडचिरोलीच्या रानगर्भातील रानफुले या कवितेला समर्पित गृपवरुन सोमवार १४ जुलै पासून राज्यस्तरीय ‘नाट्यश्री मासिक कविता’ स्पर्धांना सुरुवात झाली आहे.यापूर्वी नाट्यश्रीच्या ‘रानगर्भ फुलत आहे’ या गृप वरुन वर्षभर आठवडी कविता स्पर्धा घेण्यात आल्या व त्यातील पुरस्कृत ६० कवींना नाट्यश्रीच्या वार्षिक समारंभात आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या कवितेला उत्कृष्ट कविता म्हणून पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले होते.यावेळी नाट्यश्रीने मासिक कविता स्पर्धा आयोजीत केली असून त्यात विजेत्या कवींना नाट्यश्री उत्कृष्ट कवी व कवितेला उत्कृष्ट कविता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.यासाठी दर महिण्याला तीन उत्कृष्ट कवींची निवड करण्यात येणार आहे.त्यांना प्रथम,द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून नियमित सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा विनामुल्य असून केवळ कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासने हा संस्थेचा उद्देश आहे. झाडीपट्टीतील कवींना विशेष प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक कवींनी स्पर्धेचे नियम अटी व इतर अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) व्हॉट्सॲप नंबर ९६२३६६३४३५ किंवा योगेश गोहणे (कविता विभाग प्रमुख)व्हॉट्सॲप नंबर ९४०२१२७२७३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!