- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एक आश्चर्यचकित करणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,जे काम नगर परिषदेने करायला पाहिजे होते,असे काम शिवसैनिकांनी करून दाखविल्याने आरमोरी स्थित नागरिकांनी शिवसैनिकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.तर आरमोरी नगर परिषदेच्या कारभारावर रोष व्यक्त केले आहे.
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे आवागमन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाश्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.शहरात मुख्य रस्त्यांवर तसेच इतरत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून छोटे-मोठे अपघात घडत होते.ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.शहरातील समस्या दूर करण्यासाठी नगर प्रशासन पुढे धजावत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे गड़चिरोली लोकसभा प्रमुख धनंजय गहेरवार,युवासेना विधानसभा संघटक नारायण धकाते,गडचिरोली जिल्हा समन्वयक राकेश बैस, शिवसेना शहर अश्विन तितिरमारे सह आरमोरी शहरातील शिवसैनिकांच्या वतीने आरमोरी शहरातील जुने बस स्थानक,नविन बस स्थानक व देसाईगंज (वडसा)रोड टी पॉईंट या प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यात आले.जे काम नगर प्रशासनास जमले नाही,असे काम शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केल्याने शिवसैनिकांच्या या स्तुत्य उपक्रमाची शहरवासियांकडून प्रशंसा केली जात आहे.
- Advertisement -

