Monday, April 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त..अन्यथा राशन कार्डवरील नाव कमी होऊन राशन होणार बंद..

..अन्यथा राशन कार्डवरील नाव कमी होऊन राशन होणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना राशन दुकानात ई-केवायसी प्रक्रिया करणे शासन स्तरावरून अनिवार्य करण्यात आले आहे.याकरिता पुरवठा विभागाद्वारे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असली तरीही अजूनपर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून पर्यंत ई-केवायसी केली नाही,अश्यांनी  तात्काळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,अन्यथा राशन कार्डवरील नाव कमी होऊन धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
ई-केवायसी प्रक्रिया ही राशन दुकानात असलेल्या ई-पॉस मशीनवर केली जाते.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिकांव्दारे राशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचे निर्देश शासनाव्दारे देण्यात आले आहे.वारंवार सूचना दिल्यानंतरही ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिकेमधून नाव कमी केले जाणार असून अश्यांना धान्य दिले जाणार नाही.त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही,अश्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानामधून ई-केवायसी करून घ्यावी.तसेच जे लाभार्थी गाव सोडून कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत,त्यांनी तेथील स्वस्त धान्य दुकानामधून किंवा आपल्या मोबाइलमध्ये ‘मेरा ई-केवायसी ॲप’ डाऊनलोड करून त्यामधून केवायसी पूर्ण करून घ्यावी,असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!