Thursday, May 28, 2026
Homeभंडाराटिनावर ठेवलेली छत्री हातात घ्यायला गेला अन् चिकटूनच राहिला; ४४ वर्षीय इसमाचा...

टिनावर ठेवलेली छत्री हातात घ्यायला गेला अन् चिकटूनच राहिला; ४४ वर्षीय इसमाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पाऊस असल्याने शेताकडे जाण्यासाठी
घराच्या अंगणात असलेल्या टिनाजवळील छत्री काढण्यासाठी गेलेल्या मोठा भावाला विजेचा धक्का बसला.त्यामुळे लहान भावाने धाव घेत छत्री हातात घेतली असता विद्युत प्रवाहाच्या स्पर्शात चिकटून राहिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात काल,बुधवार ९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.यात नंदकिशोर राधेश्याम साखरवाडे वय ४४ वर्षे रा.मोहगाव देवी,ता.मोहाडी यांचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार,सकाळी साडे नऊ च्या सुमारास मोठा भाऊ रविचंद्र साखरवाडे हा शेताकडे जाण्यास निघाला होता.त्यामुळे त्याने घराच्या अंगणात असलेल्या टिनाजवळील छत्री काढण्यासाठी हात पुढे केला.पावसामुळे घरासमोर लावलेले टिनाचे पत्रे ओले  होते.त्याच ठिकाणाहून इलेक्ट्रिक वायर गेल्याने कुठून तरी वायर कापला असावा व टिनामध्ये विद्युत प्रवाह संचारला असावा.याच टिनाच्या खालच्या भागाला छत्री ठेवली होती.त्यामुळे छत्रिला हात लावताच मोठ्या भावाला विजेच्या धक्का बसला.हे दृश्य पाहून त्याचा लहान भाऊ नंदकिशोर साखरवाडे धावून गेला.नंदकिशोर छत्रीला आलेल्या विद्युत प्रवाहाला पकडून राहिला. त्यामुळे त्यांचे वडील राधेश्याम यांनी नंदकिशोरकडे धाव घेतली.त्यावेळी वडिलांनाही विद्युत प्रवाहने फेकून दिले.यावेळी वडिलांना करंट लागल्याचे पाहताच त्यांचा मुलगा ऋषभ याने तात्काळ विद्युत प्रवाह बंद केला.तोवर उशीर झाला होता.मोठ्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात लहान भावाचा जीव गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!