Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीआरमोरीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न.. -आमदार मसरामांनी योगासनाचा लुटला...

आरमोरीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न.. -आमदार मसरामांनी योगासनाचा लुटला आनंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार २१ जून रोजी आरमोरीच्या क्रीडा संकुल येथे तालुका क्रीडा संकुल समिती तसेच हितकारिणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या योग दिनाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना योगाचे मानसिक,शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले.”योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो मन:शांतीचा व जीवनशैली सुधारण्याचा प्रभावी मार्ग आहे.युवकांनी नियमित योग साधना अंगीकारली पाहिजे.” असे मसराम यांनी मार्गदर्शन प्रसंगी उपस्थितांना सांगितले. आरमोरीतील क्रीडा संकुल अधिक आधुनिक,सुसज्ज आणि युवकांना पोषक असे बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमानंतर मसराम यांनी संपूर्ण क्रीडा संकुल परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली व स्थानिक स्तरावर आवश्यक त्या सुधारणा,सुविधा व विकास कामांची माहिती घेतली.योग दिनानिमित्त अनेक योगप्रेमींनी सहभाग नोंदवला.यात विद्यार्थी,नागरिक,शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांनी योगासने,प्राणायाम व ध्यान साधना करून योगासनाचा आनंद लुटला.यावेळी उपस्थित माजी आमदार कृष्णा गजबे,आरमोरी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास गवते, भारत बावनथडे,पंकज खरवडे,पवन नारनवरे, पतंजली जिल्हा समन्वय चाकिनार पवार,बहेकार यांनी उपस्थिती दर्शविली होती.कार्यक्रमाचे संचालक ज्ञानबोनवार,तर आभार प्रदर्शन मनोज मने यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!