- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्ता स्थापन केली.तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेत महायुतीला घाम फोडला होता.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने पराभवाला सामोरे जाण्याची कारणे शोधून निवडणूक आयोगाला मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागितले.त्यानुसार आज,शनिवार २१ जून रोजी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आयोग अशाप्रकारचे फुटेज देणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने केलेली मागणी ही त्यांच्यासाठी योग्य असली,मतदारांच्या हिताची असली किंवा लोकशाही प्रक्रियेच्या संरक्षणासाठी योग्य असली तरी देखील प्रत्यक्षात त्याचा उद्देश अगदी उलट उद्दिष्ट साध्य करणारा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मागणीला अतिशय तार्किक मागणी म्हणून समोर आणले जात आहे.ती प्रत्यक्षात मतदारांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेच्या चिंतेचे उल्लंघन आहे.हे लोकप्रतिनिधीत्व कायदा,१९५० आणि १९५१ मध्ये घालून दिलेल्या कायदेशीर भूमिकेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.असे फुटेज शेअर केले तर ज्यांनी मतदान केले आहे आणि ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्या गोपनियतेला धोका निर्माण होईल.दोघेही असामाजिक घटकांचे लक्ष्य बनू शकतात.यामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला मतदार ओळखणे सोपे जाईल,अशी भीती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही; असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
- Advertisement -

