- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जातो.अश्यातच प्रत्यक्षात काम करणाऱ्या कामगारांना योजनेची माहिती,त्यासाठी लागणारे दस्तऐवज,मिळणारा लाभ व योजनेपासून कुणीही वंचित राहू नये,यासाठी आज, शनिवार २१ जून रोजी शिवराजपुर गट ग्रामपंचायतीच्या सभागृहात कुरुड-कोकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांचा मेळावा भारतीय जनता पार्टी तालुका देसाईगंज ग्रामीणच्या वतीने पार पडला.प्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी लोककल्याणकारी सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जनतेची सेवा करावी व तालुकास्तरावरच सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा,यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रोशनी पारधी ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी, देसाईगंज जिल्हा परिषद सिंचाई विभागाचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी माणिक बनसोड,माजी उपसरपंच तथा शिवराजपुर गट ग्रामपंचायतीचे सदस्य वासुदेव झिलपे,कल्पतरू असंघटित कामगार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अंबादे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्यास कुरुड-कोकडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो बांधकाम कामगार यांचेसह नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

