- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही प्रकरणांमध्ये सुरळीत चालणाऱ्या नात्यात दुरावा निर्माण झाला की,सुड भावनेने एखाद्यास जाणून-बुजून कायद्याच्या कचाट्यात गोवण्यात येते.मात्र,अशी प्रकरणे चिरकाल टिकणारी नसतात.केव्हा ना केव्हा तरी अश्यांचे पितळ उघडे पडतेच.पण एखाद्या व्यक्तीची एकदा कां प्रतिमा मलिन झाली की,त्यास कितीही धुवून,पुसून,स्वच्छ केले तरीही ते न मिटणारे असते.अश्याच प्रकारे एका प्रकरणात न्यायालयाने खडेबोल सूनावत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.मानहानी झाली की,मनुष्य जिवंत असूनही मृत समजला जातो.वाईट माणूस चालेल,पण वाईट नाव नको; कारण अपकीर्ती संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.कायद्यांचा गैरवापर व्हायला नको,कायद्यांचा उपयोग सूडासाठी न करता संरक्षणासाठीच व्हायला हवा,असे एका खोट्या गुन्ह्यात प्रियकर व त्याच्या मित्राला अडकवलेल्या प्रकरणात लखनौच्या न्यायालयाने म्हटले असून २४ वर्षीय महिलेस साडेसात वर्षाची शिक्षा व दोन लाख १० हजाराचा दंडही ठोठावला आहे.
- काय आहे प्रकरण👇
रेखा आणि राजेशचे प्रेमसंबंध होते.नात्यात कटुता आल्यानंतर रेखाने राजेश व त्याचा मित्र भूपेंद्र कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर आरोप करीत गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक होऊन ते तीन महिने तुरुंगात राहिले.मात्र,पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात तक्रार खोटी असल्याचा अहवाल सादर केला.रेखाने पोलिसांच्या या अहवालाला विरोध केला. त्यामुळे खटला चालविण्यात आला व न्यायालयाने राजेश व भूपेंद्र यांची निर्दोष मुक्तता तर केलीच उलट रेखाविरुद्ध कलम १८२ (लोकसेवकाला खोटी माहिती देणे) व २११ (खोटा गुन्हा दाखल करणे) अंतर्गत दोषी ठरवले.लखनौच्या विशेष न्यायालयाचे न्या.विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी रेखाला साडेसात वर्षाचा तुरुंगवास व २ दोन लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.रेखाने एससी,एसटी कायद्यांतर्गत मिळवलेला मदतनिधी परत वसूल करण्याचे आदेश कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.एससी-एसटी कायदा, पॉक्सो व इतर संवेदनशील कायद्यांचा गैरवापर केला गेला तर जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होईल.असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवित खोटा गुन्हा दाखल केलेल्या महिलेला दणका दिला आहे.
- Advertisement -

