- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गावालगतच्या तलावाजवळ ९ मित्र पार्टी करायला गेले.पार्टी केल्यानंतर पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या ९ पैकी एकजण बुडाल्याने करून अंत झाल्याची घटना बुधवारी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावात घडली.शोध मोहीमे दरम्यान काल गुरुवारी तलावात मृतदेह सापडताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.३१ वर्षीय सचिन सेवकराम धुर्वे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.सचिन हा मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकत होता.सचिनला वृद्ध आई-वडील,पत्नी व दोन लहान मुले असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.गावालगतच्या तलावामध्ये ९ मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते.पार्टीतील जेवणा सर्वांना पोहण्याची इच्छा झाली.सोबतच सचिनही पाण्यात उतरला.मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागला.अश्यातच
अन्य मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो अयशस्वी ठरला.सचिन बुडाल्याची माहिती अन्य मित्रांनी गावात दिली.त्यानुसार गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत गोबरवाही पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार बुधवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते.अंधार पडल्याने शोधकार्य काहीकाळ थांबविण्यात आले.परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल गुरुवारी सकाळच्या सुमारास प्रेत बाहेर काढल्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisement -

