Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीदहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांचा दावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी  केला आहे.सर्व कामे शासकीय नियमांचे काटेकोर पालन करूनच करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
  • नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा दावा👇
साखरवाडे यांनी खुलाशात नमूद केले की,कोरची तालुक्यातील नाडेकल ते बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ अंतर्गत येते.त्यामुळे या कामाशी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२ अथवा स्वतःचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर काम अद्याप अंतिम स्वरूपात पूर्ण झालेले नसून, पुरामुळे बाधित झालेल्या भागाची दुरुस्ती संबंधित कंत्राटदार स्वतःच्या जोखमीवर व खर्चाने करणार असल्याचे लेखी हमीपत्र देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
  • देयक प्रक्रिया तांत्रिक तपासणीनंतरच👇
कामांची देयके अदा करण्याची प्रक्रिया नियमानुसार आणि विविध स्तरांवरील तांत्रिक तपासणीनंतरच केली जाते,असे त्यांनी सांगितले.संबंधित कनिष्ठ अथवा शाखा अभियंता कामाची नोंद मोजमाप पुस्तिकेत(एमबी) करतात.त्यानंतर उप-अभियंता प्रत्यक्ष तपासणी करून प्रमाणीकरण करतात.कार्यकारी अभियंता म्हणून नियमानुसार केवळ ५ टक्के मोजमाप तपासण्याची जबाबदारी असते.त्यामुळे “काम न करता कोट्यवधींची बिले काढण्यात आली” हा आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  • लेखापरीक्षणात आक्षेप नसल्याचा उल्लेख👇
विभागीय कार्यालयातील सर्व देयके,मासिक लेखे व व्हाउचर नियमितपणे महालेखापाल कार्यालयाकडे सादर केले जातात.महालेखापाल कार्यालयाकडून दरवर्षी वार्षिक लेखापरीक्षण केले जाते.आपल्या कार्यकाळात कोणत्याही कामावर महालेखापाल कार्यालयाने आक्षेप नोंदविलेला नसल्याचे साखरवाडे यांनी सांगितले.
  • गुणवत्ता नियंत्रणाची नियमित तपासणी👇
सर्व कामे सक्षम अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीनंतर तसेच वित्तीय अधिकारांच्या मर्यादेतच केली जातात.याशिवाय ‘दक्षता व गुण नियंत्रण मंडळा’ मार्फत कामांची गुणवत्ता तपासली जाते.तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधित ज्ञापन काढून पूर्तता झाल्यानंतरच कामे निकाली काढली जातात,असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • पदोन्नती व बदली प्रक्रिया शासनस्तरावर👇
एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असल्याच्या आरोपांबाबत त्यांनी सांगितले की,गडचिरोली येथील बदलीविरोधातील प्रकरण मॅट,उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे बदली प्रक्रियेस विलंब झाला होता.न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आपण २ नोव्हेंबर २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२ मध्ये रुजू झालो असल्याचे त्यांनी नमूद केले.शिवाय,गडचिरोली मंडळात १० वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पदोन्नतीनंतरची पदस्थापना ही शासनस्तरावरील अधिकार असून त्यासंदर्भातील प्रक्रिया शासन निर्णयानुसार राबविण्यात येते.नागपूर विभागात अधीक्षक अभियंत्यांच्या ५ जागा रिक्त असून शासन ज्या ठिकाणी पदस्थापना देईल,तेथे कार्यभार स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  • निष्पक्ष चौकशीची मागणी👇
तक्रारदाराचे कोणतेही वैयक्तिक नुकसान झालेले नसून,उपलब्ध निधीनुसार संबंधित कंत्राटदारांची देयके नियमानुसार अदा करण्यात आल्याचे  साखरवाडे यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणात चौकशी समितीने सर्व दस्तऐवजांची निष्पक्ष छाननी करून सत्य समोर आणावे,अशीही स्पष्ट भूमिका  त्यांनी मांडली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!