Tuesday, September 22, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी..

वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिट अंतर्गत येणाऱ्या जीवनापूर येथील तरुणाला वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 प्रवीण मेघश्याम चिमलवार वय ३० वर्षे,रा.जीवनापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे.जीवनापूर येथील प्रवीण हा गावाशेजारी जंगल  परिसराम भटकत होता.त्यातच तो काल गुरुवारी गावापासून काही अंतरावर एका शेताच्या नाल्याजवळ बसून असतांना वाघाने त्याच्यावर हल्ला केला.हल्ला करताच त्याने आरडाओरड केल्याने वाघाने जंगलात पलायन केले. काही वेळानंतर सदर घटना लोकांच्या लक्षात आली असता त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरूप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक अरविंद माने व वनरक्षक पंडित मेकेवाड यांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला.जखमीला सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.घटनास्थळी कॅमेरे लावून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.परिसरातील शेतकऱ्यांना शेतावर काम करतांना सावधानता बाळगण्याची सूचना वनविभागाद्वारे देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!