Thursday, May 28, 2026
Homeभंडारापोहण्यासाठी तलावात उतरलेल्या ९ पैकी एकजण बुडाला..

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या ९ पैकी एकजण बुडाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गावालगतच्या तलावाजवळ ९ मित्र पार्टी करायला गेले.पार्टी केल्यानंतर पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या ९ पैकी एकजण बुडाल्याने करून अंत झाल्याची घटना बुधवारी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावात घडली.शोध मोहीमे दरम्यान काल गुरुवारी तलावात मृतदेह सापडताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.३१ वर्षीय सचिन सेवकराम धुर्वे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.सचिन हा मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकत होता.सचिनला वृद्ध आई-वडील,पत्नी व दोन लहान मुले असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.गावालगतच्या तलावामध्ये ९ मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते.पार्टीतील जेवणा सर्वांना पोहण्याची इच्छा झाली.सोबतच सचिनही पाण्यात उतरला.मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागला.अश्यातच
अन्य मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो अयशस्वी ठरला.सचिन बुडाल्याची माहिती अन्य मित्रांनी गावात दिली.त्यानुसार गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत गोबरवाही पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार बुधवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते.अंधार पडल्याने शोधकार्य काहीकाळ थांबविण्यात आले.परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल गुरुवारी सकाळच्या सुमारास प्रेत बाहेर काढल्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!