Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरमोठी बातमी शौचास गेलेल्या इसमाचा जंगली हत्तींनी उलचून आपटल्याने मृत्यू; आज...

मोठी बातमी शौचास गेलेल्या इसमाचा जंगली हत्तींनी उलचून आपटल्याने मृत्यू; आज सकाळची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोली जिल्ह्यातील टस्कर हत्तीच्या जोडीने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार १३ जून रोजी सावली वन परिक्षेत्रात प्रवेश केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांनाच परत सिंदेवाही तालुक्यात प्रवेश करीत एका ४५ वर्षीय इसमास ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्याच्या जाटलापूर मोठा येथे आज,रविवार १५ जून रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.मारोती मसराम वय ४५ वर्षे, रा.जाटलापूर मोठा,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे जंगली हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले दोन जंगली हत्ती कधी सावली तालुक्यात तर कधी सिंदेवाही तालुक्यात मुक्तपणे संचार करीत आहेत.अश्यातच आज रविवारी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथील मारोती मसराम हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या मोकळ्या परिसरात शौचासाठी गेले होते.शौचासाठी बसले असतांनाच  दोन हत्ती पोहोचले.हत्ती तिथे आल्याने मारोती अचानक उभा झाला.यामुळे हत्ती बिथरले आणि त्यांनी मारोतीला सोंडेत पकडून उचलले आणि जमिनीवर आपटले.यात मारोतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हत्तींना पळवून लावण्याचा प्रयत्न केला.घडलेल्या
घटनने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दोन्ही हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!