- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- गावातीलच एका १९ वर्षीय तरुणाने उज्ज्वल भविष्यासाठी धडपडण्याच्या दिवसांत तिच्यावर अवघ्या १३ व्या वर्षी मातृत्व लादण्याचे पाप केल्याची घटना नुकतीच भिवापूर येथे उघडकीस आली.प्रकरणी तक्रार प्राप्त होताच,पोलिसांनी पोस्कोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा नोंदवीत,आरोपीला अटक केली आहे.सुशील योगेश मेश्राम वय १९ वर्षे,ता.भिवापूर,जि.नागपूर असे आरोपीचे नाव आहे.पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह आरोपीच्या घरालगत राहत असून,भिवापूर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकते.मार्च २०२५ पासून मासिक पाळी आली नसल्याने पीडितेच्या आईने तिला गत १ जून रोजी शहरातीलच एका महिला डॉक्टरकडे दाखविले. औषधोपचारानंतरही काहीच फायदा न झाल्यामुळे शुक्रवारी १३ जून रोजी पुन्हा तिला डॉक्टरांकडे दाखविण्यात आले.तपासणी केली असता,पीडित मुलगी गर्भवती असल्याचे आढळले.विश्वास न बसल्यामुळे पालकांनी लागलीच उमरेड येथील लॅबमध्ये सोनोग्राफी करून घेतली.रिपोर्टमध्ये पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता,हे ‘पाप’ गावातीलच सुशील याचे असल्याचे तिने सांगितले.या प्रकरणी पीडितेच्या आईकडून तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१),६४ (२)(एम),६५ (१) पोस्को ४,६,८ अन्वये गुन्हा नोंदवीत,आरोपीला अटक केली.प्रकरणी ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप सडमेक तपास करीत आहेत.
- Advertisement -

