- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गडचिरोली जिल्ह्यातील टस्कर हत्तीच्या जोडीने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार १३ जून रोजी सावली वन परिक्षेत्रात प्रवेश केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांनाच परत सिंदेवाही तालुक्यात प्रवेश करीत एका ४५ वर्षीय इसमास ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्याच्या जाटलापूर मोठा येथे आज,रविवार १५ जून रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.मारोती मसराम वय ४५ वर्षे, रा.जाटलापूर मोठा,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे जंगली हत्तींच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले दोन जंगली हत्ती कधी सावली तालुक्यात तर कधी सिंदेवाही तालुक्यात मुक्तपणे संचार करीत आहेत.अश्यातच आज रविवारी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर मोठा येथील मारोती मसराम हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या मोकळ्या परिसरात शौचासाठी गेले होते.शौचासाठी बसले असतांनाच दोन हत्ती पोहोचले.हत्ती तिथे आल्याने मारोती अचानक उभा झाला.यामुळे हत्ती बिथरले आणि त्यांनी मारोतीला सोंडेत पकडून उचलले आणि जमिनीवर आपटले.यात मारोतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली.त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हत्तींना पळवून लावण्याचा प्रयत्न केला.घडलेल्या
घटनने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दोन्ही हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

