Saturday, September 5, 2026
Homeभंडाराभंडाराच्या हर्षा भुरे उत्कृष्ट कवयित्री पुरस्काराने सन्मानित..

भंडाराच्या हर्षा भुरे उत्कृष्ट कवयित्री पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-नुकतेच काळीज माझं साहित्य छत्रपती संभाजीनगर समूहाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा नाशिकच्या पार्क साईड नेस्ट सोसायटी परिसरात मोठ्या थाटात पार पडला.सोहळ्यास राज्यातील शंभरहून अधिक साहित्यिक तथा सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.तत्पूर्वी गुडीपाडवा समूहातर्फे ‘सण आला पाडव्याचा’ विषयावर कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एका पेक्षा एक दर्जेदार कवी, साहित्यिक स्पर्धेत सहभागी झाले होते.यामध्ये भंडारा येथील हर्षा भुरे यांनीही सहभाग घेतला होता. त्यानुसार त्यांच्या कवितेला उत्कृष्ट मानांकन देत रोख रक्कम व शाल देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांची मुख्य ओळख असलेले लाडूकाव्यला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सदर सोहळ्यास काळीज माझं साहित्य छत्रपती संभाजीनगर व काळीज प्रकाशन संस्थानचे अध्यक्ष सुरेखाताई बेंद्रे,संपादक,गीतकार,अभिनेता गुलाबराजा फुलमाळी,जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांच्या  हस्ते नाशिक येथे मान्यवरांचे सत्कार तथा बक्षीस वितरणाचा सोहळा उत्साहात पार पडला.हर्षा भुरे ह्या यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित असून त्या नेदर्श प्रकाशन संस्था,साहित्य माझे जीवन, साहित्याचा गोडवा व लाडूकाव्यलेखन समूहाच्या संंस्थापिका आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!