Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरअंगावर विज कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू..

अंगावर विज कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यात पावसाने उसंत घेतली असली तरीही काही ठिकाणी पाऊस अचानकपणे हजेरी लावून जात आहे.अश्याच प्रकारे काल,सोमवारी ९ जून रोजी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातही काल सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.पाऊस सुरू होण्यापूर्वी मित्रांसह देवदर्शनासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. सदरची घटना काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.प्रथमेश अतुल वानखेडे रा.चिमूर, जि.चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
माहितीनुसार,चिमूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोरगाव येथील हनुमान मंदिरात प्रथमेश वानखेडे व काही मित्र देवदर्शनासाठी गेले होते. काहीकाळ थांबल्यानंतर अचानकपणे ढगाळ वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस बरसू लागला.त्यातच विजांचे कडकडाट सुरू झाले. तितक्यातच प्रथमेशच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!