Friday, May 1, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात ट्रकची स्कूटीला जोरदार धडक; आई आणि मुलीचा घटनास्थळीच मृत्यू..

अज्ञात ट्रकची स्कूटीला जोरदार धडक; आई आणि मुलीचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-अपघातांची मालिका संपता-संपेना.राज्यातच नव्हे तर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसून येतात.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुराहून बल्लारशाहकडे स्वतःच्या स्कूटी वाहनाने जात असतांना वाटेतच आई आणि तिच्या मुलीवर काळाने घाला घातल्याची घटना आज, सोमवार ९ जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.एका अज्ञात ट्रकने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने स्कूटीवर स्वार असलेल्या माय-लेकिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ज्योती बंडू रागीट वय ४२ वर्षे व मुलगी सेजल बंडू रागीट रा.पेठ वार्ड-राजुरा, ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे अपघातात ठार झालेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.
माहितीनुसार,दोघीही मायलेकी आज स्कूटी क्रमांक- एमएच ३४ बीएन ५५३८ ने काही कामानिमित्त राजुराहून बल्लारशाहकडे जात होत्या.जात असतांनाच भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने राजुरा-बल्लारशाह मार्गावरील वर्धा नदीचा पुल ओलांडताच जलाराम बाप्पा मंदिराजवळ स्कूटीला जोरदार धडक दिली.यात दोघीही मायलेकी मुख्य मार्गावर कोसळून जागीच ठार झाल्या. धडक देऊन अज्ञात ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. सदरची घटना मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!