Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न..

देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संबंधाने स्थानिक पटेल लॉन देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)पक्षाची आढावा बैठक व माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा सत्कार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र वासेकर,प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभेचे माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते रामकृष्ण मडावी, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसूला,युवकचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,महिला जिल्हा कार्याध्यक्ष वृषालीताई भोयर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष आरिफ पटेल विद्यार्थी जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी,शैलेश पोटवार,विधानसभाध्यक्ष किशोर तलमले,कार्याध्यक्ष सुनील नंदनवर,चोपचे माजी सरपंच आत्माराम सूर्यवंशी,मिलिंद डोंगरे,तालुकाध्यक्ष संजय साळवे, शहराध्यक्ष लतीफ शेख,तालुका कार्याध्यक्ष मनोज तलमले,इत्यादी उपस्थिती होते.यावेळी तालुक्यातील विविध पक्षाच्या सेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.प्रसंगी पक्षाचे दुपट्टे घालून धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रवेश करून घेतला.आगामी निवडणूक ही युती  सोबत राहून लढू नाहीतर वेळ पडली तर स्वतंत्र लढू, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आढावा बैठक प्रसंगी सांगितले.तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागण्याचेही आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस युनूस शेख,संचालन संजय साळवे तर आभार प्रदर्शन लतीफ शेख यांनी मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!