Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसंभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता एकाच वेळी तीन महिन्यांचे मिळणार राशन..

संभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता एकाच वेळी तीन महिन्यांचे मिळणार राशन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-संभाव्य अतिवृष्टी,पूरपरिस्थिती लक्षात घेता,एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.त्यामध्ये जून,जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत धान्याचा समावेश राहणार आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य अतिवृष्टी, पूरपरिस्थिती लक्षात घेता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यादृष्टीने पुरवठा विभागाकडून तयारी सुरू आहे.येत्या १५ जूनपर्यंत राज्यात मॉन्सून
सक्रिय होईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सुरुवातीच्या काळात जोरदार पाऊस पडतो, त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी,नदी-नाल्यांना पूर येऊन आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू शकते.अशावेळी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून तीन महिन्यांचे रेशन ३० जूनपूर्वी वितरित करण्यात येणार आहे.राज्यातील पुरवठा विभाग कामाला लागला आहे.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व रेशन दुकानांत धान्य पोहोचविण्यात येत आहेत.१५ जूनपर्यंत पूर्ण धान्य पोहोचेल,यासाठी नियोजन सुरू आहे.तसेच वेळेत सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळेल असा विश्वास पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.यंदा पहिल्यांदाच तीन महिन्यांचे राशन एकाचवेळी मिळणार असल्याने पोटा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!