Friday, September 11, 2026
Homeभंडाराबसची ट्रॅक्टरला जोरदार धडक; ट्रॅक्टर चालकाचा खाली कोसळून मृत्यू..

बसची ट्रॅक्टरला जोरदार धडक; ट्रॅक्टर चालकाचा खाली कोसळून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विर्षी गावच्या ट्रॅक्टर चालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार ४ जून रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर विर्शि फाटा येथे घडली.स्वतःच्या गावाहून राष्ट्रीय महामार्गाने साकोलीकडे ट्रॅक्टरने जात असतांना बसने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने सदरचा अपघात घडला.यात ५० वर्षीय लेकचंद गोपीचंद कापगते रा. विर्षी,ता.साकोली याचा ट्रॅक्टर वरून खाली पडून मृत्यू झाला.
माहितीनुसार,लेकचंद कापगते हे आज सकाळच्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक-एमएच-३६ एन २११३ व ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक-एम एच ३६ ए एल ८२५५ ने  विर्षीकडुन साकोलीकडे जात असतांना गोंदियाकडून नागपूरच्या दिशेने जाणारी बस क्रमांक-एमएच ४० एन ८८७२ चे चालक विकास राहिनिनाथ लाडे वय ४० वर्षे, रा.मरारटोली,गोंदिया यांनी ताब्यातील बस भरधाव वेगाने चालवून ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली.धडक देतातच ट्रॅक्टर चालक लेकचंद कापगते हे ट्रॅक्टरवरून रस्त्यावर खाली पडले.त्यांच्या डोक्याला व शरीराला गुपित मार लागल्याने लगेच त्यांना साकोली उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.अश्यातच तपासणी अंती डॉक्टरांनी लेकचंद यांना मृत घोषित केले.प्रकरणी बसचा चालक हा ट्रॅक्टर चालकाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने विर्षी येथील फिर्यादी मयंक कापगते यांच्या तोंडी तक्रारीवरून साकोली पोलिस ठाण्यात आरोपी बस चालकाविरुद्ध कलम २८१,१०६ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम १८४ मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार दिनेश तिजारे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!