Tuesday, April 28, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात प्लास्टीक बंदी मोहीम; ४० किलो प्लॉस्टीक जप्त.. -प्लास्टीक ऐवजी कापडी...

देसाईगंज शहरात प्लास्टीक बंदी मोहीम; ४० किलो प्लॉस्टीक जप्त.. -प्लास्टीक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज (गडचिरोली):- ५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.यंदाचे  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त UNEP यांच्याकडून “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” अशी थीम घोषित करण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने जागतिक स्तरावर सुरु असलेल्या प्लास्टिक प्रदूषण निर्मुलन मोहेमे अंतर्गत देसाईगंज नगर परिषदेचे  मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक बंदी मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत अंदाजे ४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त व ईतर सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात करून १५,५०० रुपये इतकी दंडात्मक कार्यवाही करून वसूल करण्यात आली.
यापूर्वी रस्त्यावरील विक्रेते,फुल विक्रेते,भाजीपाला मंडी,दुकाने,बाजारपेठ,शॉपिंग माल,हॉटेल्स व्यवसाईकांना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.परंतू  पाहिजे त्या प्रमाणात आळा न बसल्याने सदरची कारवाई करण्यात आली.यावेळी नगर परिषदेने केलेल्या कारवाईत प्लास्टिक आढळल्यास प्रथमत: ५ हजार रुपयाचा दंड,दुसऱ्यांदा आढळून आल्यास दहा हजार दंड आणि तिसऱ्यांदा आढळून आल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणी तीन महिन्यांची शिक्षेची तरतुत असल्याची माहिती यावेळी व्यावसायिकांना देण्यात आली.
  • डॉ.कुलभुषण रामटेके,मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज👇

    - Advertisement -
    - Advertisement -
    - Advertisement -
जागतिक पर्यावरण दिनाच्या नमित्ताने शहरात प्लास्टीक बंदीची कारवाई सुरु आहे.देसाईगंज शहरासाठी नागरीकांनी आपले योगदान द्यावे.तसेच व्यवसायीकांनी प्लास्टीक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!