Saturday, July 11, 2026
Homeआरमोरीई-रिक्षा उलटून प्रवासी महिलेचा मृत्यू; आरमोरी तालुक्यातील घटना..

ई-रिक्षा उलटून प्रवासी महिलेचा मृत्यू; आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील डार्ली येथील रहिवासी असलेले पती-पत्नी कामे आटोपून ई-रिक्षाने स्वगावी परत जात असतांना वाटेतच रिक्षाला ट्रॅक्टरने धडक दिल्याने रिक्षा उलटला.यात प्रवासी असलेले पती-पत्नी खाली कोसळले.दोघांनाही जबर मार लागल्याने गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,महीलेच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.ललिता प्रकाश मडावी वय ४० वर्षे,रा.डार्ली,ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.तर पती प्रकाश मडावी यांचेवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.सदरची घटना काल, बुधवारी दुपारच्या सुमारास वडधा गावातील शिवाजी चौकाजवळ घडली.
माहितीनुसार,डार्ली येथील ललिता व प्रकाश मडावी हे दोघेही पती-पत्नी काही कामानिमित्त पोर्ला येथे गेले होते.पोर्लावरून कामे आटोपून ते ई-रिक्षाने स्वगावी परत जात असतांना वडधा गावातील शिवाजी चौकाजवळ ट्रॅक्टरने ई-रिक्षाला धडक दिली.यात रिक्षा उलटून ललिता या रस्त्यावर कोसळल्या.त्यामुळे डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत महिला व तिच्या पतीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले.अश्यातच उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात ललिता यांचा मृत्यू झाला.तर प्रकाश मडावी यांच्यावर उपचार सुरू आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!