Saturday, May 30, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील एक इसम ठार..

वाघाच्या हल्ल्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील एक इसम ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील एक इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास आवळगाव शेत शिवारातील रुपचंद गीरडकर यांच्या शेतालगत उघडकीस आली.मनोहर सखाराम चौधरी वय अंदाजे  ६० वर्षे रा.आवळगाव ता.ब्रम्हपुरी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
सद्या ग्रामीण भागात मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे.अशातच आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास मनोहर चौधरी हे शेत शिवारात आवळगाव बिटातील कक्ष क्रमांक-११३८ मध्ये मोहफुल गोळा करण्यासाठी गेले होते.मोहफुल गोळा करीत असतांनाच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे मनोहर यांचेवर हल्ला चढवून नरडीचा घोट घेतला.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.परिसरात मोहफुल वेचणारे तसेच शेतावरील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली व सदर घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे व मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला.त्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.वनविभागाने मृतकाच्या कुटुंबीयाना तातडीची मदत म्हणून पन्नास हजाराची आर्थिक मदत केली आहे.घडलेल्या घटनेने परिसरातील ग्रामस्थ तथा शेतकरी धास्तावले असून तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आवळगाव वासियांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!