Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरसहाय्यक मोटर निरीक्षकास ५०० रुपयाची लाच भोवली..

सहाय्यक मोटर निरीक्षकास ५०० रुपयाची लाच भोवली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाहनांच्या चेकपोस्टवर चंद्रपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक मोटर निरीक्षक व एका खासगी कर्मचाऱ्याला ५०० रुपयांची लाच भोवली. प्रकरणी चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना
 रंगेहात अटक केली.
माहितीनुसार,आदिलाबाद ते चंद्रपूर मार्गावर तेलंगणातील आदिलाबाद येथील तक्रारदाराचे हा  ट्रक नियमित चालत असतात.अशातच घटनेच्या वेळी कर्तव्यावर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते आणि त्याचा खासगी कर्मचारी जगदीश डफडे उपस्थित होते.यावेळी तेलंगणा सीमेवर ट्रकला थांबवून कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली.सर्व कागदपत्रे बरोबर असतांना व गाडीचे वजन बरोबर असतांनाही एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रुपये लाचेची मागणी केली.वारंवार हा प्रकार या ठिकाणी सुरू असल्यामुळे तक्रारदारांनी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागत तक्रार दाखल केली.ही रक्कम देण्याचे ट्रक चालकाने मान्य करून ५०० रुपये दिले.चंद्रपुरातील तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे स्वीकारतांना सहाय्यक मोटर निरीक्षक शिवाजी विभुते व खाजगी कर्मचारी जगदीश डफडे याला ५०० रुपयांची लाच घेतांना अटक केली.सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व खाजगी कर्मचाऱ्याला ताब्यात घेत्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयात ५६ हजार रुपये सापडले. सापडलेल्या रकमेबाबत त्यांनी कुठलेही सबळ स्पष्टीकरण न दिल्याने सदरचे पैसेही जप्त करण्यात आले आहेत.सदरची कारवाई अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपुरात केल्याने चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

कार चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कार चालकाचे स्टेअरिंगवरून अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कार थेट तिसऱ्या लेनमधील अज्ञात वाहनाला मागून धडकून झालेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!