- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-मोबाईलचा अतिवापर त्यातच अश्लील व्हिडिओच्या आहारी जाऊन काहीजण सर्वकाही गमावून बसू लागलेत.नको त्या वाईट मार्गाने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.खरे म्हणजे मोबाईल चांगल्यासाठी आहे.मात्र त्याचा गैरवापर करून घेतला जातो आहे.अशीच घटना चंद्रपूरच्या पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघडकीस आली आहे.अल्पवयीन मुलीवर चक्क अल्पवयीन मुलानेच अत्याचार केल्याची घटना समोर येताच समाजमन सुन्न झाले आहे.याला मोबाईल कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
घरात एकट्या असलेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.पडोली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी केली आहे.पडोली एमआयडीसी परिसरात अनेक कुटुंब विटा तयार करण्यासाठी मुक्कामी राहतात.त्यांच्या कामाच्या स्थळापासून हाकेच्या अंतरावरच त्यांच्या राहण्याची घरे आहेत.शुक्रवारी आई-वडील विटा बनविण्यासाठी गेल्यानंतर एक नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती.ही संधी साधून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला.पीडित मुलीचा आवाज ऐकून तिचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले.पीडित मुलीने झालेली घटना सांगितला. त्यांनी पडोली पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी ॲट्रोसिटी,पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
- Advertisement -

