Friday, August 7, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज डेव्हिडकिर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे ‘नन्हे उस्ताद’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या...

देसाईगंज डेव्हिडकिर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे ‘नन्हे उस्ताद’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकिर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या वतीने आयोजित  ‘नन्हे उस्ताद’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.भरतनाट्यम्,कोळीगीते,कोकरू नृत्य,आदिवासी नृत्य,देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक,विविध वेशभूषा सादर करीत विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.शाळेने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे.त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे ‘नन्हे उस्ताद’ हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील,यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. या संमेलनास हजारो विद्यार्थी,पालक आणि नागरिक उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार केले जावेत,अशी अपेक्षा कार्यक्रमाचे उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास कसा वाढवावा याची प्रचिती म्हणून शाळेचे मुख्यध्यापक पंकज मेश्राम यांनी विद्यार्थ्यांसोबत एक अप्रतिम नृत्य सादर करून केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रा.बी.पी.पडवेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पसराम टिकले,सौ.अर्चना पडवेकर सचिव बहूजन विकास शिक्षण संस्था देसाईगंज,राजेंद्र बुल्ले तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी,नितीनजी राऊत,सौ. विशाखा ठवरे मुख्याध्यापक डेव्हिडकिर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल देसाईगंज,हर्षद सोनपिपरे उपमुख्यध्यापक तसेच नंदकिशोर दाणी,शिक्षक चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झाडीपट्टी कलावंत आशु शेंडे यांनी केले तर आभार अनिकेत लोणारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शाळेचे शिक्षक वृदांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; नागरिकांचा संताप.. -नराधम आरोपीचे वकीलपत्र न घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर एका ३० वर्षीय नराधमाने सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात संतापाचा भडका उडाला...

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी महिला लोकशाही दिन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या,सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी...

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!