Friday, June 19, 2026
Homeभंडाराविवाहित महिलेवर अत्याचार; त्रासाला कंटाळून महिलेची पोलिसात तक्रार..

विवाहित महिलेवर अत्याचार; त्रासाला कंटाळून महिलेची पोलिसात तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील एका गावातील विवाहीतेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या व वारंवार त्रास देणाऱ्या ३० वर्षीय इसमाची त्रासाला कंटाळून महिलेने पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गोलू मुंडले वय ३० वर्षे रा.रुयाळ ता.पवनी असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार,पिडीत महिला पवनी तालुक्यातील एका गावातील असून महिलेचे वडिल आणि आरोपी हे मित्र असल्याने लग्नाआधीपासून आरोपीचे महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू होते.दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते.पिडीत महिला ही आधारकार्ड दुरुस्तीच्या कामासाठी ६ जानेवारी २०२५ ला आपल्या गावावरुन पवनी येथे गेली होती.सदर महिला पवनीच्या जुन्या बसस्थानकावर असतांना त्याठिकाणी आरोपी गोलू हा दुचाकीने आला आणि आपण फिरून येऊ,असे सांगत तिला दुचाकीवर बसवून गोसे मार्गावरील एका लॉजमध्ये नेले.तिथे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर १७ जानेवारी रोजी पुन्हा पवनी येथील एका लॉजवर नेऊन संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर आरोपी वारंवार महिलेला फोन करुन त्याच्याकडे येण्यास सांगत होता व धमकीवजा बोलणी करून पतीला सर्वकाही सांगण्याची धमकी देत होता.त्यामुळे महिलेने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितली.तेव्हा पतीने आरोपीला,पत्नीला फोन न करण्याबाबत बजावले असता त्यालाच धमकी दिली.२९ जानेवारी२०२५ रोजी आरोपी मुंडले हा थेट पती काम करीत असलेल्या ठिकाणी गेला.तिथे त्याने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी धमकी दिली.त्यामुळे पिडीत महिला व तिच्या पतीने पवनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.तक्रार दाखल करताच पवनी पोलिसांनी
आरोपी गोलू मुंडले याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पवनी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!