Thursday, April 30, 2026
Homeनागपूरझेलून-झेलून किती झेलनार,राग अनावर झाला..! पतीच्या छाताडावर पत्नीने मारली लाथ अन् होत्याचे...

झेलून-झेलून किती झेलनार,राग अनावर झाला..! पतीच्या छाताडावर पत्नीने मारली लाथ अन् होत्याचे नव्हते झाले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ज्या कुटुंबामध्ये खटके उडत नाही; त्याला संसारच म्हणू नये,असे एका सत्संगात प्रवचनकार बाबाने म्हटले आहे.संसार म्हटले की,पती-पत्नी मध्ये खटके उडतच असतात.अश्याच प्रकारे पती-पत्नी आणि दोन मुले असलेल्या कुटुंबाचा सुखी संसार सुरळीतपणे सुरू असतांना पतीला दारूचे व्यसन जडले.व्यसन तर जडले मात्र,त्याने हद पार केली.पत्नी झेलून-झेलून किती झेलनार,त्यातच  राग अनावर झाला आणि होत्याचे नव्हते झाल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिंगणाबोडी येथे गुरुवारी ३० जानेवारीच्या रात्री घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की,हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या पतीला दारूचे व्यसन जडले आणि दारू पिण्यासाठी तो पत्नीचे दागिने चोरून विकायला लागला.त्यामुळे चिडलेल्या पत्नीने भांडणात रागाच्या भरात त्याच्या छाताडावर जोरात लाथ मारली.त्यातच त्याचा मृत्यू झाला असून,आरोपी पत्नीस अटक करण्यात आली आहे.रोहित ऊर्फ माधव रामराव जाधव वय ३५ वर्षे,रा.हिंगोली असे मृताचे नाव आहे. तो दोन वर्षांपासून रिंगणाबोडी,ता.काटोल येथील हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा.त्यामुळे तो हॉटेलच्या मागे नोकरांसाठी असलेल्या खोलीमध्ये ३० वर्षीय पत्नी व दोन मुलांसोबत राहायचा.त्याला दारूचे व्यसन होते.या व्यसनामुळे तो हॉटेलमध्ये व्यवस्थित कामदेखील करू शकत नव्हता.सोन्याची अंगठी दिसत नसल्याने पत्नीने गुरुवारी त्याचा शोध घेतला. तो बाजारगाव येथे दारूच्या नशेत आढळून येताच तिने त्याला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घरी आणले.अंगठी विकल्याचे सांगताच रागाच्या भरात तिने त्याच्या छाताडावार जोरात लाथ मारली.बेशुद्ध पडल्याने तिने त्याला झोपवून ठेवले.रात्री उशिरापर्यंत जाग न आल्याने तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटोल शहरातील ग्रामीण रुग्णालयात पाठवून या प्रकरणात तिला अटक करण्यात आली.घडलेल्या घटनेमुळे रोहितची दोन्ही मुले अनाथ झाली.त्याचा थोरला मुलगा १० तर धाकटा मुलगा ७ वर्षांचा आहे.
त्याने दारू पिण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले व परस्पर विकले.त्यातून मिळालेल्या पैशातून तो दारू प्यायला.पत्नीला तिची सोन्याची अंगठी गायब असल्याचे गुरुवारी लक्षात आले.दारू पिण्यासाठी अंगठी विकल्याचे सांगताच ती चिडली होती.रागाच्या भरात लाथ मारल्याने त्याचा मृत्यू झाला.त्याच्या छातीवर लाथ मारल्याने पत्नीने कबूल केले.पण,त्याला आपण मारहाण केली नाही,असेही तिने पोलिसांना सांगितले. त्याच्या छातीवर उजव्या भागाला काळपट व्रण आढळून आले आहेत. ते मारहाणीचे असावेत,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.ते व्रण कसे तयार झाले,हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून माहिती मिळताच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनी रोहितच्या पत्नीला बारकाईने विचारपूस केली.पुढील घटनेचा तपास कोंढाळी पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!