Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरघरी कुणीच नसल्याची संधी साधून चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक.. - १ लाख...

घरी कुणीच नसल्याची संधी साधून चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक.. – १ लाख २९ हजाराचा ऐवज हस्तगत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा शहरातील चोरट्याने घरी कुणीच नसल्याची संधी साधून १ लाख २९ हजाराचा ऐवज लंपास केला होता.त्यानुसार राजुरा पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवीत अखेर चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे.शुभम दिलीप खोके वय २९ वर्षे रा.राजुरा असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.माहितीनुसार,राजुरा शहराच्या पेठ वार्ड येथील रहिवासी असलेले प्रशांत कवडुजी बावणे हे घटनेच्या दिवशी आपल्या कुटुंबीयांसह शेतावर गेले होते.घरी कुणीही नसल्याने त्यांनी घराला कुलूप लावून दिवसभर शेतातील कामे करून सायंकाळच्या सुमारास घरी परतले.घरी परत येताच त्यांना घराचे दार उघडे दिसून आले.त्यातच आतमध्ये प्रवेश केला असता घरातील साहित्य तसेच आलमारीचे कपाट उघडे दिसून आले.त्यानुसार आलमारीची पाहणी केली असता सोन्याची अंगठी ६ नग २० ग्रॅम,चांदीची चाळ,नगदी रक्कम १० हजार,सोन्याची गोप १५ ग्रॅम, सोन्याची गोप ६ ग्रॅम,सोन्याची पोत १० ग्रॅम,कानातील सोन्याचे जोड ३ ग्रॅम असा एकूण १ लाख २९ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे बावणे यांना दिसून येताच धक्काच बसला.त्यामुळे त्यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी साखरे,प्रभारी पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी घटनास्थळ गाठून  गुन्हे शोध पथकास आरोपीचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले.त्यानुसार राजुरा पोलिसांनी गुपित  माहितीच्या आधारे आरोपी शुभम खोके यास ताब्यात घेत चौकशी केली असता सुरुवातीला उडवा-उडविची उत्तरे दिली.मात्र,पोलिसी खाक्या दाखवताच शुभम याने गुन्ह्याची कबुली दिली.त्यानुसार पोलिसांनी चोरून नेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!