Friday, August 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला महाराष्ट्रातील ३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार.. - नागपूरचे होमिओपॅथी चिकित्सक...

उद्याला महाराष्ट्रातील ३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार.. – नागपूरचे होमिओपॅथी चिकित्सक डॉ.विलास डांगरे यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारने आज,शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून महाराष्ट्रातील ३ जणांना पद्मश्री पुरस्काराने उद्या रविवार २६ जानेवारीला गौरविण्यात येणार आहे.महाराष्ट्रातून नागपूरचे होमिओपॅथी चिकित्सक डॉ.विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथी डॉ.विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असूनसंपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ.डांगरे यांची ओळख आहे.गेल्या अनेक वर्षात त्यांनी लाखाहून अधिक रुग्णांना बरे केले आहे.
मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात ३६ वर्षे सेवा केली आहे.त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती,५ लाख किमी प्रवास,१३ भाषांचे ज्ञान, त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती.त्या माहितीची नोंद केलेल्या व ३० वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी,पक्षी,वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी २५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.
चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते.संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे.सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर,मृद व जलसंधारणाची कामे,सौर ऊर्जेचा वापर,प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न,सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!