Sunday, September 6, 2026
Homeनागपूरअख्खा कुटुंबचा-कुटुंबच 'डिजिटल अरेस्ट'.! - तुमचे सीम कार्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात...

अख्खा कुटुंबचा-कुटुंबच ‘डिजिटल अरेस्ट’.! – तुमचे सीम कार्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची दाखवली भीती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हल्ली सर्वत्र ठकबाजांकडून ‘डिजिटल अरेस्ट’ करून अनेकांना गंडा घालण्यात येत आहे.याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत असूनही अनेकजण ‘डिजिटल अरेस्ट’ चे बळी ठरू लागले आहेत.असाच खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.नागपुरात संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’ मध्ये ठेवत ६५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची  बाब समोर आली आहे.कुटुंबाला तुमचे सीम कार्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची भीती दाखविण्यात आली होती. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत घटना घडली आहे.८ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर ७०७७४०४१२५ या क्रमांकावरून फोन आला.समोरील व्यक्तीने तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले.तुमच्या नावावर खरेदी केलेल्या सीम कार्डचा उपयोग करून उघडलेल्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंग सुरू असल्याने सीबीआयकडून पडताळणी करावी लागेल असे सांगितले.त्यानंतर सायंकाळी एका व्यक्तीचा सीबीआय अधिकारी म्हणून व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल आला व त्याने त्याला विविध तपशील विचारले. तुमचा संबंध नरेश गोयल मनी लांड्रिंग स्कॅमध्ये सहभाग असल्याचा आरोप करीत डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात येत आहे; असे सांगितले.आरोपीने त्यानंतर मुलाकडून कुटुंबीय तसेच आर्थिक स्थितीबाबत जाणून घेतले.पालकांना मुलाच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली.त्याने हा प्रकार सांगितल्यावर तेदेखील घाबरले. आरोपीने त्यांनादेखील डिजिटल अरेस्टमध्ये राहण्यास सांगितले.त्यांचा व्हिडीओ कॉल सातत्याने सुरू होता. समोरील आरोपीने त्यांच्याकडून बँक खात्याचे तपशील घेतले.या प्रकरणातून बाहेर निघायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले.१० जानेवारी रोजी अधिकाऱ्याने नागपुरातून ४९ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळती केले तर त्यानंतर १३ जानेवारी रोजी विदर्भातील एका मोठ्या शहरात जाऊन तिथून २६ लाख रुपये वळती केले. बाहेर असतांनादेखील त्याचा व्हिडीओ कॉल सुरू होता.संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असतांना एक नातेवाईक त्यांना भेटले.त्यांनी का घाबरलेले दिसता? असे विचारल्यानंतर आपबिती सांगितली.त्यानुसार सदर प्रकरण उघडकीस आले.संपूर्ण प्रकरण लक्षात येताच कुटुंबीयांची बोबडीच वळली.त्यामुळे सर्व नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगावी; असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!