- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके हे काल गुरुवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.मंत्री उईके यांचे गडचिरोलीत आगमन होताच आदिवासी संघटना तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.त्यानंतर मंत्री डॉ.अशोक उईके यांनी जिल्ह्यातील आश्रमशाळा,तसेच आदिवासी वस्तिगृहांना भेट दिल्या.काल गुरुवारी रात्री गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट देत विद्यार्थिनींशी संवाद साधून मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शिक्षण आणि राहणीमानाच्या विकासासाठी शासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत,याबाबत मंत्री उईके यांनी माहिती घेतली.यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीना उपस्थित होते.
- Advertisement -

