Saturday, June 20, 2026
Homeभंडारातीन दिवसांपासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला नदीपात्रात...

तीन दिवसांपासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला नदीपात्रात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-एका कारखान्यात कामावर असणारा ३५ वर्षीय इसम कुणालाही न सांगता कारखान्यामधून निघून गेला.त्यातच कारखान्यातील कामगारांनी शोध घेऊनही मिळाला नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. अशातच तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह चुलबंद नदीपात्रात आज,गुरुवारी २३ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.देविदास दादाजी गुरुनुले वय ३५ वर्षे रा.बाळापुर(तळोधी) ता.नागभीड जि.चंद्रपूर असे नदीपात्रात आढळून आलेल्या कामगाराचे नाव आहे.माहितीनुसार,देविदास गुरुनुले हा कामगार म्हणून भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्यामध्ये बऱ्याच कालावधीपासून कामावर होता.तीन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवार दिनांक-१९ जानेवारीला देविदास हा नेहमी प्रमाणे रात्र पाळीत कामावर होता.अशातच देविदास हा त्याच रात्री कारखान्यामधून रात्रीच्या वेळेस निघून गेला.बराच वेळ होऊनही कारखान्यात परतला नसल्याने कारखान्यातील कामगारांनी त्याचा शोध घेतला.शोध घेऊनही देविदासचा थांगपत्ता लागेनासा झाल्याने कामगारांनी लाखांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.तक्रार दाखल होताच पोलिसांनी देविदासचा शोध घेणे सुरू केले.अशातच आज,गुरुवारी दुपारच्या सुमारास काही नागरिकांना लाखांदूर तालुक्याच्या चुलबंद नदीपात्रात मृतदेह असल्याचे दिसून आले.त्यानुसार सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलीस प्रशासनास देण्यात आली. घटनास्थळी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार,उपनिरीक्षक परमेश्वर आगाशे,पोलिस हवालदार गोपाल कोसरे,दिनेश बोरकर,पोलिस नाईक सुभाष सहारे,भूपेश बावनकुळे,दीपक घुले व सुधाकर ढोरे घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखांदूर रुग्णालयात दाखल केला. घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!