- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या अड्याळ येथील रोजगार हमीच्या कामांवर बोगस मजुरांची हजेरी लावली जात असल्याचा संशय व्यक्त करीत उपसरपंच शंकर मानापुरे,जावेद शेख, पंकज ढोक यांनी गटविकास अधिकारी(बीडीओ)यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती.त्या अनुषंगाने काल, शुक्रवारी १० जानेवारीच्या दुपारी रोजगार हमीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.त्यात बोगस मजुरांची नावे आढळून आली.यात रोजगार सेवक यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पंकज ढोक यांनी केली.
रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस मजुरांची नावे समाविष्ट असल्याचा प्रकार गत अनेक वर्षांपासून सुरू आहे,असे यावेळी सांगण्यात आले.महत्त्वाची बाब म्हणजे,जे मजूर कामावर येत नाही तथा गावातील नाहीत,अशा काही मजुरांची नावे उघड झाली आहेत. ही चूक झाली असल्याचे रोजगार सेवक यांनी अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या समक्ष मान्य केले.आता पुढील कारवाई काय होते? याकडे लक्ष लागून आहे.कारवाई करावी,मात्र सुरू असलेली रोजगार हमीची कामे बंद होणार नाही,याची काळजी घेतली जावी, अशीही मागणी उपसरपंच शंकर मानापुरे यांनी यावेळी केली.
प्रत्यक्ष कामाच्या भेटीदरम्यान कार्यक्रम व्यवस्थापक (पवनी) एस.एस.तागडे,सदस्य देविदास नगरे उपस्थित होते.अड्याळ येथील रोजगार हमीच्या कामावर काही मजुरांची दोन वर्षांपासून मजुरीच आली नाही,तर कुणाला कमी-अधिक मजुरी मिळाली आहे.या सर्व बाबींची आता शहानिशा होणार आहे.
- Advertisement -

