Thursday, September 24, 2026
Homeदेसाईगंजनिकृष्ट दर्जाच्या कामाची राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उकेंनी घेतली दखल.. - कंत्राटदाराची कानउघडणी...

निकृष्ट दर्जाच्या कामाची राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उकेंनी घेतली दखल.. – कंत्राटदाराची कानउघडणी करीत निकृष्ट दर्जाचे काम करवून घेतले ‘उत्कृष्ट’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुका मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड गावातील मंजूर होऊन बांधकाम करण्यात आलेल्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांना प्राप्त होताच कंत्राटदाराची कानउघडणी करीत निकृष्ट दर्जाचे काम ‘उत्कृष्ट’ बनविण्यास भाग पाडले असल्याची घटना उघडकीस आली आहे.
देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या
कुरुड गावासाठी काही महिन्यांपूर्वी मुख्य प्रवेश रस्ता ते प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुड या ठिकाणापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करण्यात आला होता.त्यानुसार काही दिवसांपूर्वी सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले.काम तर करण्यात आले,मात्र सदर करण्यात आलेल्या कामात डांबरचे प्रमाण कमी वापरण्यात आल्याने कुठे डांबर लागले तर कुठे गिट्टी पांढरकवळी दिसू लागली. झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी क्षितिज उके यांना दिली.त्यानुसार उके यांनी बांधकामस्थळी मोक्यावर जाऊन पाहणी केली असता,खरोखरच निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून आले.त्यामुळे त्यांनी बांधकाम कंत्राटदाराशी संपर्क साधून सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्वरित उत्कृष्ट करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार कंत्राटदाराने रस्त्याच्या डांबराचे प्रमाण वाढवून पुनश्च काम करून घेतल्याने ग्रामस्थांनी क्षितिज उके यांचे आभार व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!