Thursday, September 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामपंचायतीचा अनोखा ठराव; लग्नसमारंभात डीजे आणि दारूला 'नो' म्हणणाऱ्या कुटुंबास २१ हजाराचे...

ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव; लग्नसमारंभात डीजे आणि दारूला ‘नो’ म्हणणाऱ्या कुटुंबास २१ हजाराचे बक्षीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लग्न समारंभ म्हटले तर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर डीजे आणि दारूचा महापूर पहावयास मिळतो.सध्या स्थितीत काही जणांना दारू ढोसल्याशिवाय डीजेत थिरकताच येईना..! असे झाले आहे.अशातच भंग-भंग आवाज आणि नाचता-नाचता होणारा दंगा,यामुळे भांडणे वाढून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.अश्या अवस्थेत ग्रामस्थांना बऱ्याचदा नुकसानीस सामोरे जावे लागते.त्यामुळे गावचे हित जोपासणे आवश्यक असल्याने गावच्या हितावह कार्य करण्याच्या दृष्टीने
पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील एका गावातील ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावातील ग्रामपंचायतीने लग्नसमारंभात डीजे न वाजवणाऱ्या आणि दारूची विक्री न करता दारू न देणाऱ्या कुटुंबाला २१ हजार रुपये रोख देण्याची घोषणा केली आहे.सदरची रक्कम पंचायत त्या कुटुंबाला प्रोत्साहन म्हणून देईल.गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्तीची मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.बल्लो गावच्या सरपंच अमरजीत कौर यांनी म्हटले की,गावकऱ्यांनी लग्न समारंभांवर अनावश्यक खर्च करू नये आणि मद्यपानाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच साधारणपणे असे दिसून येते की, गावांमध्ये दारू दिली जाते आणि डीजे (डिस्क जॉकी) द्वारे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात.त्यामुळे भांडणे होतात,असे अमरजीत कौर म्हणाल्या.याचबरोबर,मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असल्याचे सरपंच अमरजीत कौर यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की,लग्न समारंभात व्यर्थ खर्च करू नये; यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करू इच्छितो.तसेच,पंचायतीने अश्या प्रकारचा ठरावही केला आहे, ज्यानुसार जर एखाद्या कुटुंबाने दारू दिली नाही आणि लग्न समारंभात डीजे वाजवला नाही तर त्याला २१ हजार रुपये दिले जातील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!