Tuesday, September 22, 2026
Homeभंडारारहस्यमयरित्या बेपत्ता झालेला चार वर्षीय चिमुकला आढळला जंगलातील डोंगरावर...

रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला चार वर्षीय चिमुकला आढळला जंगलातील डोंगरावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला चार वर्षीय चिमुकला अखेर आज,शनिवार ४ जानेवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास जंगलातील डोंगराच्या पायथ्यावर सुरक्षितरित्या आढळून आल्याने कुटुंबीयांनी तसेच गावातील नागरिकांसह वनविभाग आणि पोलिस विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.नील मनोज चौधरी वय ४ वर्षे,रा.चिखला खाण ५२ टाइप क्वार्टर कॉलनी,ता.तुमसर, जि.भंडारा असे चार दिवसानंतर सापडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
माहितीनुसार,नील चौधरा हा १ जानेवारी २०२५ रोजी दुपारच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत असतांना रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करुनही त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.गावकरी तसेच सर्वत्र शंका-कुशंका वाढू लागल्या होत्या.ऐन १ जानेवारीला अंगणातून मुलगा गायब झाल्याने त्याचे अपहरण झाले असावे किंवा वन्यप्राण्याने त्याला उचलून नेले असावे,असा अंदाज वर्तविण्यात येत होता.त्यामुळे पोलिसांसह वन विभागाने त्याची शोधमोहिम सुरू केली होती.शोध मोहिमेदरम्यान ड्रोनसह श्वानपथकाचाही वापर करण्यात आला.परंतु,नीलचा शोध लागत नव्हता. अशातच गावातील ग्रामस्थ,पोलीस प्रशासन,वन विभागाचे कर्मचारी शोध घेत असतांना आज, शनिवारी ४ जानेवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास नील हा जंगलातील डोंगराच्या पायथ्यावर सुस्थितीत आढळून आला.४ दिवसांच्या कडाक्याच्या थंडीत निल हा जंगलात कसा राहिला,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कुणीतरी नीलला टेकडीवर आणून सोडले असावे; अशी शंका व्यक्त केली जात आहे.
निल सापडताच त्याला गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.बालकाची प्रकृती सध्या सामान्य आहे.सदर घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून घडलेल्या घटनेचा पोलिसांनी छडा लावण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!