Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोली१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी बोलावून अत्याचार.. - २१ वर्षीय आरोपीस अटक..

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरी बोलावून अत्याचार.. – २१ वर्षीय आरोपीस अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आई-वडील बाहेर राज्यात कामासाठी गेल्याने १४ वर्षीय मुलीला तिच्या मावशीकडे ठेवले.अशातच बुधवारी १ जानेवारीला आरोपीने खोटी बतावणी करून आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याची घटना कोरची येथे घडली.याप्रकरणी तक्रारीनंतर काल,शुक्रवारी ३ जानेवारीला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.मनिष भोयर वय २१ वर्षे,रा.कोरची असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलीचे आई-वडील कर्नाटक राज्यातील विजयवाडा येथे एका कंपनीत कामासाठी गेले होते.त्यामुळे त्यांनी मुलीला तिच्या मावशीकडे ठेवले होते.बुधवारच्या रात्री मावशी कामात असतांना आरोपी मनिष तिच्या घरी गेला. ‘तुझा काका बोलावत आहे’, अशी खोटी माहिती सांगून त्याने तिला आपल्या घराकडे नेले.घराकडे नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.अत्याचार केल्याने मुलीचे कपडे रक्ताने माखले.त्यानंतर ती आपल्या मावशीच्या घरी परतली. रक्ताने माखलेले कपडे बघून मावशीने विचारणा केली. मात्र,ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीही सांगितले नाही.दुसऱ्या दिवशी रडत-रडत तिने आपबिती सांगितली.याप्रकरणी तक्रारीनंतर काल,शुक्रवारी कोरची पोलिस ठाण्यात आरोपी मनिष भोयर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. घटने प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कोरची पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे पुढील तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!