Wednesday, September 23, 2026
Homeदेसाईगंजसावधान...! देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर-फरी रस्त्यावर वाघाचे दर्शन..

सावधान…! देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर-फरी रस्त्यावर वाघाचे दर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सध्या स्थितीत देसाईगंज
तालुक्याच्या कोंढाळा जंगल परिसरात वाघांचा संचार आहे.काही दिवसांपूर्वी तीन नर वाघांसह एक मादी वाघ ट्रॅप कॅमेराबद्ध झालेला होता.त्यानंतर वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क करण्यात आलेले होते.यापैकीच एक वाघ शुक्रवार,३ जानेवारी रोजी दुपारी फरी गावाच्या कक्ष क्रमांक-८५३ मध्ये तलावालगतच्या रस्त्यावर दिसून आला.यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवराजपूर ते फरीदरम्यान कक्ष क्रमांक-८५३ मध्ये कुरुड फाटा ते किन्हाळा मुख्य मार्गाला फरी गावाला लागून असलेल्या ह्या कक्षात हा वाघ रस्त्याच्या कडेला बसून असल्याचे नागरिकांनी शुक्रवारी पाहिले.कोंढाळा जंगल परिसरात तीन वाघ व एक मादी वाघ वनविभागाने लावलेल्या टॅप कॅमेरात कैद झाले होते. उसेगाव जंगल परिसरात अनेकदा हा वाघ आढळून आला होता.मात्र,शुक्रवारी सदर वाघ शिवराजपूर ते फरी रस्त्यावर दिसून आल्याने भीती निर्माण झाली आहे.फरी परिसरातील कक्ष क्रमांक-८५३ मध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला आहे.वाघाच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष आहे.फरी,शिवराजपूर,कोकडी आदी गावांमध्ये दवंडी दिलेली आहे.नागरिकांनी शेतशिवारात,जंगलात एकटे जाऊ नये; असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!